शालेय पोषण आहार रक्कम पालकांच्या खात्यात होणार जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:32+5:302021-07-15T04:20:32+5:30

कोरोना परिस्थितीमुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन २०२१च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व ...

The amount of school nutrition food will be credited to the parents' account | शालेय पोषण आहार रक्कम पालकांच्या खात्यात होणार जमा

शालेय पोषण आहार रक्कम पालकांच्या खात्यात होणार जमा

Next

कोरोना परिस्थितीमुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन २०२१च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याचे ठरविले. परंतु यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता नवीन परिपत्रक काढण्यात आले असून, पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

नव्या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) पदाधिकारी प्रकाश चुनारकर, मोरेश्वर गौरकार, संजय लांडे, अजय बेदरे, अमोल देठे, विलास बोबडे, विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, सुशांत मुनगंटीवार, संतोष जिरकुंटवार, मधुसूदन रेड्डी, योगिनी दिघोरे, राजेंद्र पांडे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: The amount of school nutrition food will be credited to the parents' account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.