जनतेने दिलेली कराची रक्कम ग्रामसेवकाने परस्पर उडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:22+5:302021-08-25T04:33:22+5:30

मूल : गृहकर व पाणीकरापोटी जनतेकडून जमा केलेले १ लाख ९० हजार ९११ रुपये बँकेत जमा न करता ग्रामसेवकाने ...

The amount of tax paid by the people was squandered by the Gram Sevak | जनतेने दिलेली कराची रक्कम ग्रामसेवकाने परस्पर उडविली

जनतेने दिलेली कराची रक्कम ग्रामसेवकाने परस्पर उडविली

Next

मूल : गृहकर व पाणीकरापोटी जनतेकडून जमा केलेले १ लाख ९० हजार ९११ रुपये बँकेत जमा न करता ग्रामसेवकाने परस्पर खर्च केल्याची गंभीर बाब चौकशीत पुढे आली आहे. हा प्रकार मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येरगाव ग्रामपंचायतीत घडला. मनोहर दलांजे असे ग्रामसेवकाचे नाव असल्याचे चाैकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ग्रामसेवक मनोहर दलांजे यांनी जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ पर्यंत येरगाव येथील गृहकर व पाणीकरापोटी १ लाख ९० हजार ९११ रुपये लोकांकडून जमा केले होेते. ही रक्कम बँकेत जमा न करता ग्रामसेवकाने परस्पर खर्च केल्याची तक्रार येरगाव येथील संतोष कडलगवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १५ जून २०२१ ला केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ९०६/२०२१ दि. ७ जुलै २०२१ अन्वये मूल येथील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले. पंचायत विस्तार अधिकारी संजय पुप्पलवार यांनी ग्रामपंचायत येरगाव येथे सविस्तर चौकशी केली असता सदर रक्कम बँकेत जमा न करता परस्पर खर्च केल्याचे आढळून आले. यामध्ये ग्रामसेवक मनोहर दलांजेवर याचा ठपका ठेवला आहे. हा चौकशी अहवाल कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १०७७/२०२१ अन्वये ६ ऑगस्टला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. आता संबंधित ग्रामसेवकावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

कोट

येरगाव सरपंचपदी प्रतिभा जुमनाके यांची निवड झाली. सरपंच बदल झाल्यानंतर बँक व्यवहाराबाबत ठरावाला नामंजुरी देण्यात आली. २०१७-१८ पासून कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते देणे बाकी होते. तसेच पथदिवे दुरुस्ती, नळ योजना लिकेज दुरुस्ती, ब्लिचिंग पावडर खरेदी यावर खर्च करणे आवश्यक होते. जानेवारी २१ ते मार्च २१ पर्यंत गृहकर व पाणी कराचे १ लाख ९० हजार ९११ रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील जवळपास ८० हजार रुपये बँकेत जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम कर्मचाऱ्यांचे पगार व वरील बाबींवर खर्च केली आहे. यात कुठलाही गैरप्रकार झाला नाही.

- मनोहर दलांजे, ग्रामसेवक, येरगाव

Web Title: The amount of tax paid by the people was squandered by the Gram Sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.