चंद्रपुरात लवकरच अमृत दीनदयाल जेनेरिक फार्मसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:23 AM2017-11-10T00:23:57+5:302017-11-10T00:24:47+5:30
स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेहºयावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेहºयावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अमृत दीनदयाल वैद्यकीय शॉपच्या माध्यमातून जनसामान्यांना अल्पदरात औषधी उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात ८४ औषधी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. चंद्रपूर महानगरातही २५ डिसेंबर रोजी या औषधी दुकानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये दिली.
या बैठकीला भारत सरकार अंगीकृत एचएलएल लाईफ केअर लिमी.चे वरीष्ठ प्रबंधक रेजी क्रिष्णा यु., चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ डॉ. एम.जे. खान यांची उपस्थिती होती.
माहिती देताना ना. अहीर म्हणाले, सदर मेडिकल स्टोअर्स २४ तास रूग्णसेवेत सुरू राहणार असून या स्टोअर्समधून सर्वच आजावरील औषधी अल्प दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात सुरू होत असलेल्या अमृत दीनदयाल मेडिकल्समध्ये एकूण ५ काऊंटर्स राहणार आहेत.