अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स गरिबांना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:29 PM2017-12-26T23:29:57+5:302017-12-26T23:30:29+5:30
समाजातील अंतिम घटकांचा विकास, सर्वांना समान न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत....
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : समाजातील अंतिम घटकांचा विकास, सर्वांना समान न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत़ याच योजनांचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयातून माफक दरात औषधी उपलब्ध करण्यासाठी अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यात आली़ ही सेवा गोरगरिबांना वरदान ठरणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी आ. नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार, डॉ. एम.जे. खान, डॉ. सोनरकर, अॅड. दत्ता हजारे, राजेश मून, राहुल सराफ, नामदेव डाहुले, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. मुळे, डॉ. भुपेश भलमे, मनपा सभापती अनुराधा हजारे, दामोदर मंत्री रमेश मामीडवार, मोहन चौधरी आदी उपस्थित होते.
ना़ अहीर म्हणाले, गरीब व सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात दररोज २४ तास या मेडिकल स्टोअर्समधून औषधी मिळणार आहेत़ यामध्ये ब्रॉन्डेड जेनेरीक औषधी, इम्प्लॉन्ट साहित्य, पेटेंटेड ड्रग्स, सर्जिकल साहित्य सुमारे ३० ते ७० टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे. रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे़ मेडिकलमध्ये औषधांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही ना़ अहिर यांनी यावेळी सांगितले़
आ. शामकुळे म्हणाले, शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे़ सर्वांनी निरामय आरोग्यासाठी मेडिकलचा लाभ घ्यावा़ यावेळी आयसीएमआरमार्फत थॅलेसिमीया व सिकलसेल रूग्णांच्या तपासणीकरिता हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी कक्षाचे उद्घाटन तसेच लॉयन्स क्लब, नागपूर कासमॉस बँकेद्वारा पुरस्कृत नवजात बालकांसाठी ब्लँकेटचे वितरण ना़ अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवी आसवानी, संजय कंचलार्वार, श्याम कनकम, नगरसेविका शीला चौहान, माया उईके, शितल आत्राम, चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, संदीप आगलावे, प्रमोद शास्त्रकार, पुनम तिवारी, संजय खनके, राजू घरोटे, शिवाजी सेलोकर, अशोक सोनी, श्रीकांत भोयर, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, राजू भास्करवार, विनोद बुध्दावार, शेख जुम्मन रिझवी, तेजा सिंह, सतिश दांडगे, राजेंद्र कागदेलवार, स्वप्नील बनकर, बंशीधर तिवारी आदी उपस्थित होते.