चंद्रपूरकरांच्या जलपूर्तीसाठी ‘अमृत ’ योजना

By Admin | Published: May 27, 2016 01:10 AM2016-05-27T01:10:13+5:302016-05-27T01:10:13+5:30

शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून भविष्यातील

'Amrit' scheme for water supply of Chandrapurkar | चंद्रपूरकरांच्या जलपूर्तीसाठी ‘अमृत ’ योजना

चंद्रपूरकरांच्या जलपूर्तीसाठी ‘अमृत ’ योजना

googlenewsNext

आज नागपुरात बैठक : उर्जामंत्र्यांपुढे मांडणार आराखडा
चंद्रपूर : शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून भविष्यातील पेयजलाच्या नियोजनासाठी अमृत योजना तयार करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आमदार नाना श्यामकुळे यांनी यात पुढाकार घेवून बुधवारी जलसंपदा मंत्री चंद्रपुरात आले असता ही योजना त्यांनी आग्रहाने मांडली आणि मंजुरीही मिळवून घेतली आहे.
असे असले तरी ज्या ईरई धरणातून चंद्रपूरकरांसाठी पाणी घेतले जाते ते धरण उर्जा विभागाच्या अखत्यारित येत असल्याने या अमृत योजनेपुढे पेच ठाकला आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी शुक्रवारी नागपुरात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत या योजनेसंदर्भातील आराखडा ठेवला जाणार आहे.
चंद्रपूरकरांसाठी ईरइ धरण हेच पाण्याचे एकमेव स्त्रोत आहे. उर्जा विभागाने यातील अधिकचा जलसाठा चंद्रपूरसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला नाही तर शहरावर मोठे जलसंकट ओढावू शकते. हे लक्षात घेवूनच भविष्यात २०४८ या वर्षी असणारी चंद्रपूर शहराची लोकसंख्या गृहित धरून ‘अमृत योजना’ तयार करण्यात आली आहे. २०४८ मध्ये गृहित धरलेल्या ५ लाख ३३ हजार ७७७ लोकसंख्येच्या हिशेबाने वर्षाला ३२ क्युबिक मिटर पाणी आरक्षित करण्याची गरज आहे. सध्याच्या आरक्षित पाण्यापेक्षा ते १६.३२ ने अधिक असणार आहे. या विषयावर २७ मे रोजी नागपुरात उर्जामंत्र्यांसोबत महापौर राखी कंचर्लावार आणि मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांची बैठक होत आहे. यात आराखडा सादर करून मान्यतेसाठी विनंती केली जाणार आहे. राज्याचे उर्जामंत्री काय निर्णय घेतात, हे आता महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

जलसंपदा मंत्र्यांची मंजुरी
२५ मे रोजी चंद्रपुरात झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चंद्रपूर शहराचे मुख्य जलस्त्रोत ईरई नदी असल्याने या शहरासाठी भविष्यातील पेयजलाच्या तरतुदीची नैतिक जबाबदारीही उर्जाविभागाची आहे, असा दावा करण्यात आला आहे.

सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील पाणी वापराचा
सीटीपीएसपुढे पर्याय
चंद्रपूरकरांना अधिकचे पाणी मिळावे यासाठी उपाय योजण्याची गरज आहे. हे लक्षात घेवून चंद्रपुरातील दोन्ही सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील पाणी शुद्ध करून सीटीपीएसकरिता वापराला देण्याचा पर्याय पुढे आला आहे. मनपाच्या आयुक्तांनी महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना या संदर्भात पत्र लिहिले असून तसा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे ईरइ धरणावरील पाण्याचा कितीतरी भार वाचू शकेल, असा पर्याय आहे. नागपूर मनपाच्या धर्तीवर सीटीपीएसने चंद्रपूर मनपासोबत करार केल्यास हे शक्य होईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. ४५ एमएलडी क्षमतेचा पठानपुरा सिवेज ट्रीटमेंट प्लँट सप्टेंबर-२०१६ पर्यंत तर, ७० एमएलडी क्षमतेचा रहमतनगर सिवेज ट्रीटमेंट प्लँट आॅक्टोबर-२०१६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Amrit' scheme for water supply of Chandrapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.