अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी आंबटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:06 AM2018-08-20T00:06:47+5:302018-08-20T00:11:07+5:30

जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. शरद आंबटकर, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. प्रकाश बजाज सचिवपदी अ‍ॅड. संदीप नागपुरे विजयी झाले.

 Amtkar was elected president of Advocate Sangh | अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी आंबटकर

अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी आंबटकर

Next
ठळक मुद्देबार असोसिएशनची निवडणूक : नव्या कार्यकारिणीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. शरद आंबटकर, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. प्रकाश बजाज सचिवपदी अ‍ॅड. संदीप नागपुरे विजयी झाले.
बार असोशिएशनच्या निवडणुकीत अ‍ॅड. भागवत, अ‍ॅड. हस्तक, शिरपूरकर, अ‍ॅड. सातपुते, अ‍ॅड. मोगरे, अ‍ॅड. पुराणकर, अ‍ॅड, हजारे, अ‍ॅड. पाचपोर, अ‍ॅड. बापट व अ‍ॅड. कुल्लरवार आदी ज्येष्ठ वकिलांच्या पॅनेलने सर्वच पदांसाठी उमेदवार उभे केले होते. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी अ‍ॅड. बुरीले यांचा प्रभाव केला. तर उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. प्रकाश बजाज यांनी बाजी मारली. सचिवपदासाठी अ‍ॅड. संदीप नागपुरे यांनी अ‍ॅड. पाथर्डे यांचा पराभव केला. अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये सहसचिव अ‍ॅड. निलेश दलपेलवार, कोषाध्यक्ष अ‍ॅड. नितीन गाटकीने, ग्रंथपाल अ‍ॅड. सुजित गेडाम, अ‍ॅड. अमर वनकर, अ‍ॅड. मिलिंद कातकर, अ‍ॅड. राजू खोब्रागडे, अ‍ॅड. शालिकराव घरडे, अ‍ॅड. श्रीकांत कवटालवार, अ‍ॅड. वेंकटेश श्रीरामुला , अ‍ॅड. विजय हजारे, अ‍ॅड. आम्रपाली इंदूरकर, अ‍ॅड. कांचन दाते, अ‍ॅड. संजीवनी मोहरकर आदींचा समावेश आहे. विधी क्षेत्रात बार असोसिएशनची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळीही आपसातील मतभेद पुढे आले होते.

Web Title:  Amtkar was elected president of Advocate Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.