आनंद निकेतनने विविध कार्यक्रमांनी साजरा केला राष्ट्रीय क्रीडादिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:47+5:302021-09-02T04:59:47+5:30
महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय वेबिनारचेसुद्धा आयोजन केले होते. वेबिनारसाठी डेन्मार्क या देशाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा तज्ज्ञ ...
महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय वेबिनारचेसुद्धा आयोजन केले होते. वेबिनारसाठी डेन्मार्क या देशाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा तज्ज्ञ मॉर्टेन विंथर यांनी रिस्की प्ले या अनोळख्या अशा विषयावर मार्गदर्शन केले. वेबिनारसाठी १५० शिक्षक, विद्यार्थी, खेळाडू, प्राध्यापक उपस्थित होते. संचालन विद्यार्थिनी दर्शना कुत्तरमारे व सायली उपरे यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. तानाजी बायस्कर यांनी करून दिला. आयोजन प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख तानाजी बायस्कर यांनी केले. तांत्रिक साहाय्य प्रा. हेमंत परचाके व प्रा. तिलक ढोबळे, सागर टिपले, लक्ष्मीकांत ठोंबरे यांनी केले. उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार समारंभ घेण्यात आला. अनिल पाटील, बसंत सिंघ भय्या, सेवानिवृत्त प्रा. रामदास साटोने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर व आनंदवनाचे प्रमुख कार्यकर्ते शोकत खान उपस्थित होते.
010921\img_20210901_111542.jpg
warora