आनंदवन एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जंगी स्वागत

By admin | Published: January 14, 2016 01:45 AM2016-01-14T01:45:33+5:302016-01-14T01:45:33+5:30

कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाची महती साता समुद्रापलीकडे आहे. या आनंदवनच्या नावाने मुंबई-काझीपेठ

Anandvan Express's Chandrapur warships welcome | आनंदवन एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जंगी स्वागत

आनंदवन एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जंगी स्वागत

Next

वरोरा व चंद्रपुरात कार्यक्रम : मुंबई-काझीपेठ अशी साप्ताहिक गाडी
वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाची महती साता समुद्रापलीकडे आहे. या आनंदवनच्या नावाने मुंबई-काझीपेठ एक्स्प्रेस ११ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. आनंदवन एक्स्प्रेसच्या प्रथम आगमनानिमीत्त्य वरोरा रेल्वे स्थानकावर १२ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जंगी स्वागत करण्यात आले. या एक्सप्रेसचे चंद्रपुरातही जंगी स्वागत झाले.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल्स् येथे आनंदवन एक्स्प्रेसला ११ जानेवारीला सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर आनंदवन एक्स्प्रेस काझीपेठच्या दिशेने रवाना झाली. वरोरा रेल्वेस्थानकावर आनंदवन एक्स्प्रेसचे १२ जानेवारी रोजी मंगळवारला पहाटे ५ वाजताच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी वरोरा रेल्वेस्थानकावर केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन एक्स्प्रेसचे चालक, गार्ड आदी कर्मचाऱ्यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, आनंदवन ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकर कडू, रेल्वे अधिकारी एस. के. दास, व्यवसायिक निरीक्षक उमेश शर्मा, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, भाजपा तालुका संघटक ओमप्रकाश मांडवकर, विजय राऊत, नरेंद्र जिवतोडे, डॉ. सागर वझे, अरुण आखतकर, सुनील जवदंड यांच्यासह वरोरा शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Anandvan Express's Chandrapur warships welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.