ऐन हंगामात उभ्या पिकावर चालविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:19 PM2018-07-25T23:19:28+5:302018-07-25T23:20:02+5:30

Anchor runs on a standing crop in the season | ऐन हंगामात उभ्या पिकावर चालविला नांगर

ऐन हंगामात उभ्या पिकावर चालविला नांगर

Next
ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त: हताश शेतकऱ्याचे पाऊल

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागला. यावरून वन्यप्राण्यांचा शेतातील हैदोस कितपत वाढला असेल, हे दिसून येते.
राजेश ऊ लमाले रा. पोवनी असे सदर शेतकºयाचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागाप्रति रोष व्यक्त करण्यात येत असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभागाचे जबाबदार अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
शेतकरी राजेश ऊलमाले यांनी त्यांच्या तीन एकर शेतातील दोन एकर शेतात सोयाबिनचे पीक लावले होते. पंरतु वन्यप्राण्यांनी हे पीक पूर्णत: उद्ध्वस्त करून टाकले. ऊलमाले यांचे शेत अगदी वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यालगत आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीची कमी-जास्त प्रमाणात वन्यप्राण्यांनी नासधूस केली आहे. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतीची अशी नासधूस करीत असेल तर शेती करूनच काय फायदा, असा प्रश्न पोवनी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोवनीवासीयांनी केली आहे. उसनवारी कर्ज काढून या शेतकऱ्याने कशीबशी शेती केली होती. मात्र वन्यप्राण्यांनी पिकाची नासधूस केल्याने नुकसान झाले आहे.
वनविभागाचे अधिकारी करतात तरी काय?
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. परंतु वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त करीत असताना वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त का करीत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नसेल तर वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे.

माझ्या शेतात दोन एकरात सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु वन्यप्राण्यांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे सोयाबीनच्या पिकात नांगर चालवून पीक पूर्णत: काढून टाकले आहे. आता याठिकाणी दुसरे पीक घ्यावे लागणार आहे. याला वनविभाग दोषी आहे.
- राजेश ऊ लमाले
नुकसानग्रस्त शेतकरी, पोवनी

Web Title: Anchor runs on a standing crop in the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.