...आणि 'ती' शिक्षिका ढसढसा रडली, गेडामगुडा जि. प. शाळेचे वेदनादायी वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 10:35 AM2017-12-28T10:35:24+5:302017-12-28T10:36:22+5:30

ही कहाणी आहे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन स्थलांतरीत करण्याच्या शासन निर्णयाचा फटका बसलेली जि.प.प्राथमिक शाळा गेडामगुडा या शाळेची.

... and 'she' teacher Dhasda Rudali, Gedamguda district. Par. The painful reality of the school | ...आणि 'ती' शिक्षिका ढसढसा रडली, गेडामगुडा जि. प. शाळेचे वेदनादायी वास्तव

...आणि 'ती' शिक्षिका ढसढसा रडली, गेडामगुडा जि. प. शाळेचे वेदनादायी वास्तव

Next

- आशिष देरकर

कोरपना(चंद्रपूर) :  आयएसओ नामांकन प्राप्त शाळा, शाळासिध्दीमध्ये 'अ' श्रेणीत असणारी शाळा, शालेय परीसरात सुंदर बाग, बागेत फुलझाडे, फळझाडे व शालेय पोषण आहारात भाज्या व तितकीच सुंदर, गुणवत्ताधारी शाळेतील छोटी पाखरं. या शाळेतील मुलांना घडवताना तिने अक्षरशः जीवाचं रान केलं. परंतु आज शाळेला सोडून जाताना ती शिक्षिका ढसढसा रडली.
होय ही कहाणी आहे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन स्थलांतरीत करण्याच्या शासन निर्णयाचा फटका बसलेली जि.प.प्राथमिक शाळा गेडामगुडा या शाळेची.

पंचायत समिती कोरपना असलेली जि. प. प्राथमिक शाळा गेडामगुडा या जेमतेम आठ पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक लहू नवले व शिक्षिका कांचन लांबट हे दोन शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेत सुंदर फुलबाग व फळबाग फुलविली. शाळेची रंगरंगोटी केली व शाळेची गुणवत्ता वाढवून  आयएसओ मानांकनासोबत शाळासिध्दीमध्ये शाळा 'अ' श्रेणीत आणली .
शाळेची पटसंख्या आठ असली तरीही केंद्रस्तरावरील व तालुकास्तरावरील नवरत्न स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांचा हमखास क्रमांक असायचा.
अशी ही परिश्रमाने घडवलेली शाळा सोडताना मुख्याध्यापक लहू नवले यांची पावले जड झाली होती. तर सहायक  शिक्षिका कांचन लांबट ह्या ढसढसा रडल्या.  गावकऱ्यांनी तर शाळेला कुलुपच लावू दिले नाही. हसरी आणि टवटवीत फुलांची बागही कोमेजून गेली होती.
आमची शाळा आमच्या गावाची शान आहे. त्यामुळे शाळा बंद करू नये यासाठी गावकऱ्यांनी एकच टाहो फोडला. प्रत्येक विद्यार्थी व पालकांचे चेहरे कोमजलेले होते. गावातील शाळा सुरु झाली नाही तर नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराच जणू गेडामगुडा वासीयांनी दिला आहे.

 कोरपना तालुक्यातील उपक्रमशील व आदर्श शाळा म्हणून गेडामगुडा जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे. तेथील उपक्रम पाहून इतर शाळांतील शिक्षकांना गेडामगुडा शाळेचे आम्ही उदाहरण देत होतो. व एकदा तरी या शाळेला भेट देण्याची विनंती करीत होतो. १०० टकक़े आदिवासी गेडामगुडा या गावातील शाळा जरी आदर्श असली तरी मात्र शासनाच्या निर्णयापुढे आम्ही काहीच करू शकत नाही.
- रवींद्र लामगे, शिक्षण विस्तार अधिकारी

Web Title: ... and 'she' teacher Dhasda Rudali, Gedamguda district. Par. The painful reality of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.