अणेरावची कविता मराठी साहित्यात दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:54+5:302021-02-15T04:24:54+5:30

लोकयात्रा फाउंडेशन व जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळा आयोजित भंडारा येथील कवी, रेखाचित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत ...

Anerao's poem is noteworthy in Marathi literature | अणेरावची कविता मराठी साहित्यात दखलपात्र

अणेरावची कविता मराठी साहित्यात दखलपात्र

googlenewsNext

लोकयात्रा फाउंडेशन व जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळा आयोजित भंडारा येथील कवी, रेखाचित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत नाही’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲड. पारोमिता गोस्वामी, डॉ. श्याम मोहरकर, कवी प्रमोदकुमार अणेराव, श्रीपाद प्रभाकर जोशी, श्रीकांत साव उपस्थित होते.

ॲड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, काळाचा अस्वस्थ भवताल सलग वाचताच येत नाही. सुन्नता भरून येते. टी.एस. एलियेटचे वेस्ट लॅड वाचताना हीच अवस्था होते. स्त्रियांना समग्र बंधनातून मुक्त होण्यासाठी कविता आश्वासकता देते. अणेरावांची कविता भवतालचा अस्वस्थ कोलाहल मांडणारी महत्त्वपूर्ण आहे.

डॉ. मोहरकर यांनी अणेराव यांची कविता वर्तमानाचा सातबारा आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. कवी अणेराव यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक लोकयात्रा अध्यक्ष श्रीकांत साव, संचालन कवी अविनाश पोईनकर यांनी केले. आभार जय कातकर यांनी मानले.

दुस-या सत्रात कवी श्रीपाद प्रभाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. दीपक चटप यांच्या संचालनात कविसंमेलन पार पडले. यात आचार्य ना. गो. थुटे, किशोर मुगल, किशोर कवठे, इरफान शेख, राजेश बारसागडे, डॉ. प्रशांत आर्वे, नरेशकुमार बोरीकर, प्रदीप देशमुख, विजय वाटेकर, गीता रायपुरे, संजय येरणे, खुशालदास कामडी, अर्जुमन शेख यांनी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. आभार स्वप्निल मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. दीपक तुराणकर, अतुल श्रीगंदेवार, नितीन पिंपळे, स्वाती देशेट्टीवार, सूचिता खनके, प्रियंका डोंगरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Anerao's poem is noteworthy in Marathi literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.