अंगणवाडी महिलांचा मेळावा
By admin | Published: November 15, 2014 10:45 PM2014-11-15T22:45:17+5:302014-11-15T22:45:17+5:30
येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.
दुर्गापूर : येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात शकुंतला वर्मा म्हणाल्या, ‘अच्छे दिन आयेंगे’ चा नारा देऊन भाजपाने सामान्य जनतेला भुरळ पाडली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र आम्हाला दिडशे दिवस लोटूनही दुर्बीन लावून देखील अच्छे दिन पहावयास मिळाले नाही. प्रा. दहीवडे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे स्वयंघोषीत विकास पुरुष आहेत. आता ते राज्याचे अर्थमंत्री झाले असून महाराष्ट्र राज्यांच्या तिजोरीच्या चाब्या त्यांच्या जवळ आल्या आहेत. असे ते भाषणात जनतेला सांगतात. या तिजोरीतील पैसा ते दुर्बल घटकांकरिता वापरणार की ज्यांनी त्यांना निवडणुकीसाठी पोषक आहार दिला होता, त्यांच्यासाठी वापरणार हे आपल्याला पहावयाचे आहे. कारण अंगणवाडी सेविका मदतनिस यांना राज्य शासनाकडून मिळणारे दोन हजार रुपये मानधन गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी महिलांना देण्यात आले नाही. जुन्या सरकारने अंगणवाडी महिलांची फसवणूक केली होती आणि आता केंद्रात आणि राज्यात आलेले भाजपाचे नविन सरकार फसवणूक करणार असेल तर हे देखिल भांडवलदारधार्जीने सरकार आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. शारदा लेनगुरे म्हणाल्या, तत्कालिन केंद्र शासनाच्यावतीने ४५ वे श्रमसंमेलन बोलविण्यात आले होते. त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते.
योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा देण्यात यावी हे सर्व ठराव त्या संमेलनात मंजूर करण्यात आले त्या ठरावाचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.
उपस्थितांचे आभार रेखा जुनघरे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लता मोटघरे, दीक्षा मोटघरे, कमल कांबळे, छाया लिहीतकर, सुशीला मेश्राम, सीमा गायधने, सुषमा तोडासे, सीमा टोंगे, भारती तिमांडे यांच्यासह अंगणवाडी महिलांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)