विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:12 PM2018-09-26T23:12:09+5:302018-09-26T23:12:27+5:30

बालकांचा सर्वांगीण विकास, स्तनदामाता, गरोधर माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी देखभाल व जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाच्या धोरणामुळे वाढत असल्याने त्यांच्या न्याय मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी महिलांनी मोर्चा काढून लक्ष वेधले.

Anganwadi workers' front for different demands | विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुरात मोर्चा : सात तालुक्यातील महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : बालकांचा सर्वांगीण विकास, स्तनदामाता, गरोधर माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी देखभाल व जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाच्या धोरणामुळे वाढत असल्याने त्यांच्या न्याय मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी महिलांनी मोर्चा काढून लक्ष वेधले.
मोर्चा हुतात्मा स्मारकापासून निघाला. चिमूर राज्य मार्गाने एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती चिमूर येथे नेण्यात आला. नंतर मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. दरम्यान मागण्याचे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प विस्तार अधिकारी प्रमोद जोनमवार यांना देण्यात आले. यावेळी कर्मचारी सभेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शुक्ला, किसनाबाई भानारकर, इंदिरा आत्राम, कमल बारसागडे उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
२५ पेक्षा कमी मुले असतील तर ते अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करा, या आशयाचे आदेश रद्द करण्यात यावे, मानधनात वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, गणवेशासाठी दोन हजार रुपये देणे, सेवा समितीच्या लाभाच्या रकमेमध्ये तीन पटीने वाढ करण्यात यावी, जनश्री योजनेची पुर्ववत अंमलबजावणी करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत झाल्यास त्या जागी त्यांच्या वारसांना कामावर घेण्यात यावे, अंगणवाडीच्या अतिरीक्त कामाकरिता मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम देन्यात यावी, आजारपणाची एक महिन्याची भर पगारी सुटी देण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधीकारी भैया साहेब बेहरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास विभाग, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविण्यात आले.

Web Title: Anganwadi workers' front for different demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.