अनिकेत दुर्गेची गांधी फेलोशीपसाठी निवड; दोन वर्षे बिहार येथे कार्य करण्याची संधी
By परिमल डोहणे | Published: June 21, 2023 03:38 PM2023-06-21T15:38:20+5:302023-06-21T15:38:59+5:30
गांधी फेलोशिप हा एक व्यापक निवासी शिक्षण कार्यक्रम आहे. जो सरकारला बळकट करून उपेक्षित समुदायाचे जीवन सुधारण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करून युवकांचे कौशल्य विकसित करतो
चंद्रपूर : पिरामल फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणारी मानाची फेलोशिप चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील अनिकेत नामेश्वर दुर्गे यांना नुकतीच जाहीर झाली. पुढील दोन वर्षे बिहार राज्यात कार्य करण्याची संधी अनिकेतला मिळाली आहे.
गांधी फेलोशिप हा एक व्यापक निवासी शिक्षण कार्यक्रम आहे. जो सरकारला बळकट करून उपेक्षित समुदायाचे जीवन सुधारण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करून युवकांचे कौशल्य विकसित करतो. दरवर्षी देशभरातून हजारो विद्यार्थी यासाठी अर्ज करतात. त्यातील मोजक्या युवकांना ही फेलोशिप दिली जाते.
अनिकेत हा मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी असून त्याने आपले एम. एस.डब्लूचे शिक्षण सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे नुकतेच पूर्ण केले आहे. शिक्षण घेतानाच विविध सामाजिक संस्थांशी जुळून कार्य करणे, सामाजिक हिताचे विविध उपक्रम राबविण्याचे कार्य अनिकेत नेहमीच करत असतो. गांधी फेलोशिपसाठी निवड झाल्यावर अनिकेतने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, महाविद्यालयीन व इतर मित्र परिवार यांना दिले