ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर टंचाई

By admin | Published: October 22, 2014 11:16 PM2014-10-22T23:16:19+5:302014-10-22T23:16:19+5:30

सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Anil Diwali gas cylinder scarcity | ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर टंचाई

ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर टंचाई

Next

चंद्रपूर : सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
खरोखरच गॅस टंचाई आहे की, गॅस एजंसीधारकांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली, असा प्रश्न निर्माण होत आहे. सिलिंडरसाठी नागरिक एजन्सीसमोर लांबच लांब रांग लावत आहे. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही सिलिंडर मिळत नसल्याने ऐन सणासुदीच्या दिवसावर विरजन पडत आहे. दिवाळी सण १० ते १२ दिवसांचा असतो. या दिवसात प्रत्येक घरी खाद्यपदार्थ बनविले जातात. पाहुण्यांची रेलचेल असते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसातच सिलिंडरची मागणी असते. या दिवसात प्रत्येकजण अतिरिक्त सिलिंडर भरुन ठेवतात. मात्र, सिलिंडरची कमतरता दिसून येत असून नंबर लावल्यानंतरही गॅसधारकांना सिलिंडर वेळेवर मिळत नाही. गॅस सिलिंडरची घरपोच सेवा आहे. त्यामुळे प्रत्येक सिलिंडरधारकाचे गॅस एजन्सीच्या वाहनाकडे लक्ष लागून आहे. मात्र, सिलिंडर घेऊन येणारे वाहनच येत नसल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढत आहे. ज्यांनी १५-२० दिवसांपूर्वी नंबर लावले, त्यांनाही गॅस सिलिंडर न मिळाल्याने नागरिकच गॅस एजन्सीत येत आहेत.
गॅस सिलिंडर एजन्सीला त्यांच्या आवश्यक कोट्यानुसार सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मग सिलिंडरचा तुटवडा कसा निर्माण होतो, असा प्रश्न ग्राहकांनी केला आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसातच नेहमी सिलिंडरचा पुरवठा निर्माण होत असल्याने एजंसीच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आॅनलाईन बुकिंगची पद्धत असल्याने अनेकजण आॅनलाईन बुकिंग करतात. परंतु, गर्दीचे कारण पुढे करुन आॅनलाईन बुकिंग करणाऱ्याला सिलिंडर दिले जात नाही. त्यांना एजंन्सीमध्ये बोलाविले जाते. एजन्सीमध्ये गेल्यावर पुन्हा गर्दीचे कारण पुढे करुन दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जाते. असा प्रकार सिलिंडरधारकांसोबत सुरु असल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाला या प्रकारची संपूर्ण माहिती असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Anil Diwali gas cylinder scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.