जनावरे तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:46+5:302021-07-01T04:20:46+5:30
कोठारी : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून जनावरे तस्करी करणाऱ्या वाहनास कोठारी ते कवडजई मार्गांवर कोठारी पोलिसांनी थांबवून वाहनातील ३५ ...
कोठारी : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून जनावरे तस्करी करणाऱ्या वाहनास कोठारी ते कवडजई मार्गांवर कोठारी पोलिसांनी थांबवून वाहनातील ३५ जनावरांची सुटका केली व दोघांना अटक केली.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या कोठारी, कवडजई, तोहोगावमार्गे नेहमी जनावरांची आडमार्गाने वाहतूक होत असते. वडसा येथून अशीच जनावरे चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार तुषार चव्हाण यांना मिळताच त्यांनी कोठारी, कवडजई मार्गावर गस्त लावली. जनावरे वाहतूक करणारे वाहन (टीएस २० टी ६७३२) थांबवून तपास केला असता त्या वाहनात ३५ जनावरे आढळून आली. ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सदर वाहन, जनावरे ताब्यात घेऊन आरोपी मुंडकर मोशीद खलिल (२१, रा. मंगरूळ ता. जळकोट जि. लातूर) व असलम नबी शेख (२०, रा. गणेशपूर ता. वाकडी जि. आसिफाबाद, तेलंगणा) यांना अटक केली. पुढील तपास कोठारीचे पीएसआय धीरज राजूरकर व पो.काॅ. श्रीनिवास जाधव, सचिन पोहनकर, हरिश्चंद्र देऊडकर, साईनाथ उपरे, बालाजी कवलकर करीत आहेत.