कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:28+5:302021-03-01T04:32:28+5:30

प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार वरोरा : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल ...

The animals in the shelter are unsafe | कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

Next

प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार

वरोरा : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. अनेक ग्रामीण भागातील प्रस्ताव सादर करण्यात आल्याने समस्या सुटणार आहेत.

जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

चंद्रपूर : बिनबा गेटमार्गे रामनगर चौकात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या संख्येने जड वाहन जात आहेत. या मार्गावर अपघाताची शक्यता असल्याने जड वाहतूक बंद करावी. रामनगर व बिनबा गेट परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर परिसरात सुविधांचा अभाव

चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते व नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. नाल्या न झाल्याने सांडपाणी तुुंबून राहते. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाने या परिसरात सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे

चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगीनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. कोरोनामुळे स्वच्छतेला महत्त्व दिले जात आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

वरोरा : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक आता बाजारात येत आहेत. मात्र वाहने रस्त्यावरच ठेवत असल्याने अडचणी वाढत आहेत.

येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा

कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छतादूतांच्या समस्या कायमच

चंद्रपूर : सरकारच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य व महात्मा फुले योजना राबविल्या जातात. या योजनेची जिल्ह्यात योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्या समस्या सुटल्या नाही, असा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे. सफाई कामगारांना योजनांचे लाभ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

सावली : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच सावलीतील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रबी पिकाची तयारी करीत आहे. अशा वेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या

टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The animals in the shelter are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.