कत्तलीसाठी नेणारे जनावरे पकडली
By admin | Published: July 6, 2016 01:13 AM2016-07-06T01:13:06+5:302016-07-06T01:13:06+5:30
जनावरांची खरेदी करून वाहनाद्वारे जनावरे कत्तलीसाठी नेत असताना पोलिसांच्या नाकाबंदीत दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत चार जनावरे पकडण्यात आली
घुग्घुस : जनावरांची खरेदी करून वाहनाद्वारे जनावरे कत्तलीसाठी नेत असताना पोलिसांच्या नाकाबंदीत दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत चार जनावरे पकडण्यात आली असून चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी पडोली येथे झाली.
वसीम शेख इस्माईल शेख रा. घुटकाळा वॉर्ड व नाशिर उर्फ राजू इस्माईल बाजार वॉर्ड चंद्रपूर असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास तडाळी जवळ पडोली पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान नागपूरकडून एमएच-३४ एबी २६७२ क्रमांकाचे चारचाकी वाहन चंद्रपूरकडे जात असताना पोलिसांनी अडविले.
मात्र वाहनचालकाने दुसऱ्या मार्गाने वाहन वेगात पळविले. पोलिसांना संशय आल्याने वाहनाचा पाठलाग करण्यात आला.
वाहन थांबवून चौकशी केली असता, त्यात तीन गाई, एक बैल आढळून आले. जनावरे व वाहन ताब्यात घेऊन दोघांना अटक करण्यात आली. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामदास केंद्रे, शंकर घोरुडे, चंदू ताजने, स्वप्नील बुरुळे, धनराज कोयचाळे यांनी केली. पकडलेली जनावरे कोंडवाड्यात टाकली जाणार आहेत. (वार्ताहर)