अंगणवाडी सेविकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:21 PM2018-03-17T23:21:10+5:302018-03-17T23:21:10+5:30

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयाची मर्यादा कमी करुन ६५ ऐवजी ६० करण्यांचा निर्णय शासनाने नुकताच घेतला.

Ankangwadi Sewak's Resentment | अंगणवाडी सेविकांचा आक्रोश

अंगणवाडी सेविकांचा आक्रोश

Next
ठळक मुद्देसात तालुक्यातील महिलांचा सहभाग : प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
चिमूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयाची मर्यादा कमी करुन ६५ ऐवजी ६० करण्यांचा निर्णय शासनाने नुकताच घेतला. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात हिंदू मजदूर सभा सलग्नीत अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्राच्या सात तालुक्यातील शाखांच्या वतीने जिल्हाध्यक्ष इमरान इखलाख कुरेशी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाची सुरुवात हुतात्मा स्मारक येथून करण्यात आली. मोर्चादरम्यान शासनाच्या निर्णयाचा निषेध करुन अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. पंचायत समिती चिमूरच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष इमरान कुरेशी यांनी मार्गदर्शन केले. सदर मोर्चामध्ये शासनाने १ एप्रिल २०१८ नंतर निवृत्त होणाºया अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू करण्यात यावे, निवृत्ती वेतन वय ६५ कायम ठेवण्यात यावे, ३ ते ६ वर्ष वयोगटांतील बालकांच्या कमी उपस्थितीचे कारण सांगून अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना, प्रधान सचिव, व विभागीय आयुक्तांना देण्यात आले. उपस्थितांचे आभार चिमूर तालुका अध्यक्ष माधुरी विर यांनी दिले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली. यावेळी चिमूरच्या अध्यक्षा माधुरी विर, सचिव इंदिरा आत्राम, मूलच्या अध्यक्ष सिंधू मद्दावार, सचिव वैशाली कोपूलवार, नागभीड अध्यक्ष प्रभा चामटकर, सचिव सविता चौधरी, ब्रम्हपुरी उपाध्यक्ष संघमित्रा रामटेके, वरोरा अध्यक्ष अन्नपूर्णा हिरादीवे, उपाध्यक्ष पुष्पा ठावरी, सिंदेवाही उपाध्यक्ष शोभा मेश्राम, सचिव कमल बारसागडे, लता देवगडे, हसीनाबानू शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Ankangwadi Sewak's Resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.