‘अंकुर’ने दिला शेतकऱ्यांना दगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:24 AM2019-07-08T00:24:30+5:302019-07-08T00:25:00+5:30
चिमूर तालुक्यातील वाहांगाव, खुरसापार येथील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे प्रभाकर वाण १८९-३६५६१ घेऊन पेरणी केली. मात्र कालावधी होऊनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : चिमूर तालुक्यातील वाहांगाव, खुरसापार येथील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे प्रभाकर वाण १८९-३६५६१ घेऊन पेरणी केली. मात्र कालावधी होऊनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
कृषी उपविभाग चिमूर अंतर्गत येणाऱ्या वाहांगाव येथील शेतकऱ्यांनी नामवंत अंकूर कपनीचे प्रभाकर चे वाण पेरणी केले. मात्र उगवण्याचा कालावधी होऊनही सोयाबीन वाण उगवले नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व ज्या विभागाच्या पालकत्वात शेतकरी शेती करतात त्या विभागासह चिमुरचे उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी सुधाकर थुटे, अमोल रणदिवे, रा. वाहांगाव, सुरेश धानोरकर, बाला बुच्चे, नरेश नरुले, योगेश चिडे खुरसापार आदी शेतकरी उपस्थित होते.
चौकशीचे आदेश
पेरणी केलेल्या सोयाबीनचे वाण उगवले नसल्याचे तक्रार प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांनी कृषी विभाग,पंचायत समिती, कृषी विभागला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कृषी अधिकारी ललित सुर्यवंशी, श्रवण बोढे, टाकरस यांनी शेतात जाऊन चौकशी सुरु केली आहे.