पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:32 AM2017-11-16T00:32:15+5:302017-11-16T00:32:34+5:30
तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली. तर ऐन कापणीच्या वेळेस धान पिकाला मावा व तुडतुडा रोगांने पिकांवर हल्ला केल्याने प्रचंड नुकसान झाले. १० ते १५ टक्के उत्त्पन्नाची खात्री राहिली नाही. पिकाची शाश्वती राहिलेली नाही. हीच स्थिती सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यातही आहे. त्यामुळे ५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संजय मारकवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मूल येथे निवेदनाद्वारे केली.
वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेले पीक गमावण्याची वेळ आली. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करू शकतात. काही शेतात धानाचे पीक दूरून बरे दिसत असले तरी, प्रत्यक्षातील स्थिती चिंताजनक आहे. सन २०१५ मध्ये मूल तालुक्यासह सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी होती. मात्र त्यावेळीसुद्धा शेतकºयांची घोर निराशा केली. यावेळी मात्र त्यापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. धान उत्पादक शेतकºयांची वास्तविक परिस्थिती लक्षात घेवून एकरी १० हजार रुपये किंवा १ हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांची घोषणा करावी अथवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, धनंजय चिंतावार, विनोद कामडे आदी उपस्थित होते.