गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:14 AM2017-11-20T00:14:53+5:302017-11-20T00:15:32+5:30
शासनाने घोषीत केलेली कर्जमाफी ही पूर्णता फसवी निघाली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
वढोली : शासनाने घोषीत केलेली कर्जमाफी ही पूर्णता फसवी निघाली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. त्यातच यावर्षी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. पीक डोलाला लागल्यानंतर किडींच्या प्रादुर्भाव झाला. तर परतीच्या पावसाने शेतकºयांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोढला जात आहे. त्यामुळे गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यातच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज माडुरवार यांच्या नेतृत्वात खा. शरद पवार यांना देण्यात आले.
यावर्षी पावसाने वेळी-अवेळी हजेरी लावली. तरीसुद्वा शेतकºयांनी मेहनतीने पीकांचे उत्पादन घेतले. मात्र पीक डोलाला लागल्यावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्या. त्यापासून पीकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच ते सहा वेळा फवारणी केली.
गोंडपिपरी तालुक्यातील अनेक भागात वनसमृध्दी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रानडुकरांनी शेतात हौदोस घातला. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याच्या मागणीचे निवेदन सुरज माडुरवार खा. शरद पवार यांना दिले.