बँकेतील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:25 AM2020-12-24T04:25:45+5:302020-12-24T04:25:45+5:30

तळोधी येथे स्टेट बँक ही एकमेव राष्ट्रीय बँकेची शाखा आहे. शेतकरी, शेतमजूर व विविध गावातील अधिक खातेदारांची ...

Annoying customers due to technical difficulties in the bank | बँकेतील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना मनस्ताप

बँकेतील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना मनस्ताप

Next

तळोधी येथे स्टेट बँक ही एकमेव राष्ट्रीय बँकेची शाखा आहे. शेतकरी, शेतमजूर व विविध गावातील अधिक खातेदारांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. सकाळीच नंबर लागावा, यासाठी शेतकरी, शेतमजूर व अन्य खातेदार बँकेत आर्थिक व्यवहार व देवाण-घेवाण करण्याकरता येतात. मात्र लिंग फेल होत असल्याने आर्थिक देवाणघेवाण थांबतात. काहींना रिकाम्या हाताने गावाला परत जावे लागत आहे. हा असा प्रकार काही दिवसापासून सुरू आहे.

निवडणुकीसाठीबँक खाते पुस्तिकेची गरज

राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. निवडणुकीसाठी बँक खाते पुस्तिकेची गरज आहे. त्यामुळे खातेदारांची संख्या वाढली आहे.अशा परिस्थितीत लिंक फेलचा ग्राहकांना फटका बसत आहे.

Web Title: Annoying customers due to technical difficulties in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.