आनंदवनला दरवर्षी पाच लाखांचा निधी देणार

By admin | Published: December 11, 2015 01:40 AM2015-12-11T01:40:44+5:302015-12-11T01:40:44+5:30

कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना मोजक्याच कुष्ठरोग्यांना घेवून केली. आज आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापार पोहचले असल्याने देश-विदेशातील पर्यटक आनंदवनात येतात.

Annual funding of Rs 5 lakhs annually to Anandvan | आनंदवनला दरवर्षी पाच लाखांचा निधी देणार

आनंदवनला दरवर्षी पाच लाखांचा निधी देणार

Next

बाळू धानोरकर यांची घोषणा : विकास कामांना मिळणार गती
वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना मोजक्याच कुष्ठरोग्यांना घेवून केली. आज आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापार पोहचले असल्याने देश-विदेशातील पर्यटक आनंदवनात येतात. त्याचा ताण आनंदवनावर पडत आहे. आनंदवनातील विकास कामे व्हावीत याकरीता आनंदवनाला दरवर्षी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा आमदार बाळू धानोरकर यांनी आनंदवनात आयोजित मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराच्या समारोपप्रसंगी केली.
यावेळी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे डीन पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने, जे.जे. रुग्णालयाच्या नेत्र शस्त्रचिकित्सक डॉ. रागीनी पारेख, आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू उपस्थित होते. कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनात आज कुष्ठरोगी, अंध, अपंग, वयोवृद्ध आदी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.
आनंदवनात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, जुळलेली अवयवे दूर करण्याचे शिबिर, डोळ्यातील तिरपेपण काढण्याचे शिबिर दरवर्षी आयोजीत करण्यात येते. या शिबिराचा लाभ परिसरातील हजारो नागरिक घेवून आपले आरोग्य टिकवत आहे. या सोबतच आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापलीकडे गेल्याने आनंदवनचे कार्य बघण्याकरीता देशविदेशातील नागरिकांची सतत वर्दळ असते.
अशाही परिस्थितीत कर्मयोगी बाबांचे कार्य आज आनंदवनातील तिसरी पिढी वाहुन घेत आहे. याचे आमदार बाळू धानोरकर यांनी कौतुक करीत आनंदवनाला दरवर्षी पाच लाख रुपयाचा निधी आमदार निधीतून देण्याची घोषणा केली. याबाबत आमदार धानोरकर यांनी प्रस्तावही मागीतले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Annual funding of Rs 5 lakhs annually to Anandvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.