आणखी १२ तस्कर जाळ्यात

By admin | Published: April 9, 2015 01:14 AM2015-04-09T01:14:20+5:302015-04-09T01:14:20+5:30

वाघाचे अवयव तस्करी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून यातील आरोपींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

Another 12 smugglers trapped | आणखी १२ तस्कर जाळ्यात

आणखी १२ तस्कर जाळ्यात

Next

मूल : वाघाचे अवयव तस्करी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून यातील आरोपींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. तपासाची चक्रे चिचपल्ली वनपरिक्षेत्र व मूल येथील बफर झोन कार्यालयाच्या वनाधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या चालविल्यानंतर या प्रकरणातील आणखी १२ आरोपींना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या १५ वर पोहोचली आहे.
मुख्य आरोपी दिलीप श्रीहरी मडावीया या इसमाला मूल येथील बसस्थानक परिसरात वाघाच्या अवयवाची तस्करी करताना वनविभागाच्या पथकाने पकडले. त्यानंतर दोन आरोपींना पकडण्यात आले. न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावल्यानंतर तपासाची चक्रे चिचपल्ली वनपरिक्षेत्र व मूल येथील बफर झोन कार्यालयाच्या वनाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या चालविली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भादुर्णी येथील कक्ष क्र. ४८५ मध्ये घडलेल्या शिकार चक्रात आतापर्यंत १५ आरोपींना पकडण्यात आले आहे. यातील तिघांना न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे बुधवारी अटक करण्यात आलेल्यांगमध्ये मुकुंदा तोडासे रा. भांदुर्णी, राजू जिदगिलवार रा. मारोडा, दिलीप गोटेफोडे रा. मूल, किशोर गणविर रा. मूल, मिथुन हलदर रा. चंद्रपूर तर गडचिरोली येथील आदित्य अशोक बिसेन, गुड्डू प्रभाकर मोहुर्ले, संजय नरसय्या गणवेनवार, सूरज उमाजी तावाडे, आदीक सादीक शेख, मंगेश वासुदेव लोणारकर, प्रशांत लहुदास तुमराम यांचा समावेश आहे.
चंद्रपूर येथील एका आरोपींच्या शोधात वनविभागाचे पथक फिरत असून त्याचा थांगपत्ता लागला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकरणात आरोपीची संख्या लक्षात घेता ग्रामीण भागातून चंद्रपूर- गडचिरोली सारख्या शहरात याचे तार पोहचले असल्याचे दिसून येते. आरोपींना पकडण्यासाठी सहायक वनसंरक्षक विवेक मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण, क्षेत्रसहाय्यक जांभुळे, गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी ओ. बी. पेंदोर, सहाय्यक वनसंरक्षक पवार, क्षेत्रसहाय्यक सोनवाने, नेवारे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Another 12 smugglers trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.