पोषण अभियानात जिल्हा राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:24 PM2018-10-02T22:24:20+5:302018-10-02T22:24:37+5:30
१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेने उत्तम कामगीरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेने उत्तम कामगीरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांचा यासाठी ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या पोषण अभियानाच्या माध्यमातून पोषण महिना सप्टेंबर २०१८ च्या प्रचार व प्रसिद्धीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने चंद्रपूर जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांक बहाल करून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास सचिव गुप्ता, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त इंद्रा मालो यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी यांना पुरस्कार देण्यात आला.