ॲन्टी मायक्रोबल कोटिंग करणार कोरोनापासून बचाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:35+5:302021-09-03T04:28:35+5:30
गौरव स्वामी वरोरा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वत्र पसरली आहे. तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने ...
गौरव स्वामी
वरोरा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वत्र पसरली आहे. तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण बसला आतून-बाहेरून पूर्णपणे आधुनिक पद्धतीने ॲन्टी मायक्रोबल कोटिंग करण्यात आले आहे.
या कोटिंगची वैधता दोन महिने असल्यामुळे ही कोटिंग वर्षातून तब्बल सहा वेळा केली जाणार आहे. या कोटिंगमुळे प्रवाशांचा कोरोना संक्रमणापासून बचाव होणार आहे. कोरोनाचा संपूर्णपणे नायनाट करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास हा आणखी अधिक सोयीस्कर व आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होणार आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तिच्या ब्रीदवाक्याला एसटी महामंडळ खरी ठरली आहे. कोरोना काळात एसटीच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे बराच फटका हा एसटी महामंडळाला बसला. बरेच प्रवासी हे बसने प्रवास करणे टाळत असले तरी एसटी महामंडळ आजही संपूर्णपणे सुरक्षित आहे, हे सिद्ध झाले आहे.
कोट
प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ॲन्टी मायक्रोबल कोटिंग करण्यात आली आहे. प्रवाशांच्या हितासाठी एसटी महामंडळ आजही कटिबद्ध आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीने सुरक्षित प्रवास करावा, हा यामागचा उद्देश आहे.
-रामटेके आगार व्यवस्थापक वरोरा
020921\20210902_163500.jpg
तिसऱ्या लाटेच्या सुरक्षितेसाठी एसटी महामंडळ सज्ज
राज्य परिवहन महामंडळाचा अभिनव उपक्रम