भटक्या कुत्र्यांना देणार अँटी रेबीज लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:01+5:302021-09-25T04:30:01+5:30

चंद्रपूर : भटक्या व मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शहरातील सर्व गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस (एआरव्ही) ...

Anti rabies vaccine for stray dogs | भटक्या कुत्र्यांना देणार अँटी रेबीज लस

भटक्या कुत्र्यांना देणार अँटी रेबीज लस

Next

चंद्रपूर : भटक्या व मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शहरातील सर्व गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस (एआरव्ही) देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशनच्या संयुक्तवतीने २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज डेनिमित्त फिरते अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पहायला मिळत आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते. ॲनिमल बर्थ कंट्रोल रुल २०२१ च्या (डॉग्स) नुसार अँटी रेबीज प्रोग्रॅम अंतर्गत चंद्रपूर शहरातील सर्व भटक्या व मोकाट गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशनच्यावतीने कुत्र्यांना अँटी रेबीज लस दिली जाणार आहे. ही लस देण्यासाठी फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे.

गावठी कुत्र्यांना लस देण्यासाठी स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंदरे, कुणाल महल्ले यांच्याशी संपर्क साधावा. या मोहिमेत प्यार फाऊंडेशनचे देवेंद्र रापेल्ली, कुणाल महले, अर्पित सिंग ठाकूर, विनोद डोंगरे, ओम जयस्वाल सेवा देणार आहेत.

Web Title: Anti rabies vaccine for stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.