शेतकऱ्यांच्या बांधावर मजुरांची ॲंटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:00+5:302021-06-06T04:22:00+5:30

मदनापूर ग्रामपंचायतीचा उपक्रम मासळ( बु ) : कोरोना आजाराच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घालले आहे. दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात ...

Antigen inspection of laborers on farmers' bunds | शेतकऱ्यांच्या बांधावर मजुरांची ॲंटिजन तपासणी

शेतकऱ्यांच्या बांधावर मजुरांची ॲंटिजन तपासणी

Next

मदनापूर ग्रामपंचायतीचा उपक्रम

मासळ( बु ) : कोरोना आजाराच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घालले आहे. दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात आजाराने शिरकाव केला. रुग्णसंख्या वाढत जात आहे. त्यामुळे कोरोना आजारावर वेळीच उपचार व्हावा म्हणून कोरोना रॅपिड ॲंटिजन तपासणीचे शिबीर रोजगार हमीच्या मजुरांची तपासणी थेट शेतकऱ्याच्या बांधावर करण्यात आली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात रौद्ररूप धारण केले आहे. त्याचबरोबर शासनाने तिसऱ्या लाटेची पूर्वकल्पना सर्व प्रशासनाला दिली आहे. ग्रामीण भागातील परिसरातील गावात पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाने अनेक रुग्ण दगावले. कोरोना आजाराचे लवकर निदान व उपचार व्हावा. ग्रामीण भागातील शेत मशागतीचे कामे काही दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे मासळ बु गावातील कोरोना हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायत मदनापूरने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरांची तपासणी बोडी खोलीकरण सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आली. तपासणी करण्यासाठी पुरुष, महिला मजुरांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. मजुरांनी तपासणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतचे सचिव केशव गजभे, आरोग्य सेवक प्रदीप बन्सोड, किशोर नवघरे, माणिक भोंडे, आरोग्य सेविका प्रणिता पिसे, प्रेमिला बोरकुटे, तलाठी अनिल वाघमारे, रोजगार सेवक किशोर मगरे, मोरेश्वर डुमरे उपस्थित होते.

===Photopath===

050621\img-20210605-wa0187.jpg

===Caption===

कोरोना अँन्टीजन तपासणी

Web Title: Antigen inspection of laborers on farmers' bunds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.