रस्त्यावर फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी, दोन दिवसात एकही पॉझिटिव्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:42+5:302021-06-06T04:21:42+5:30
बल्लारपूर : रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याची मोहीम बल्लारपूर शहरात काही दिवसांपासून नगरपालिका, आरोग्य विभाग तसेच तहसील कार्यालयाकडून ...
बल्लारपूर : रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याची मोहीम बल्लारपूर शहरात काही दिवसांपासून नगरपालिका, आरोग्य विभाग तसेच तहसील कार्यालयाकडून होत आहे. या चाचणी दरम्यान प्रारंभीच्या काही दिवसात काही पॉझिटिव्ह निघालेत. मात्र मागील दोन दिवसात एकही पॉझिटिव्ह निघाला नाही, ही दिलासादायक बातमी आहे.
या चाचणीत गेले चार दिवसात आढावा घेतला जात असता १३४ व्यक्तीमधून एक जण, दुसऱ्या दिवशी १३४ मधून एक, तिसऱ्या दिवशी १०१ मधून एकही नाही, तर शनिवारच्या झालेल्या चाचणीत १०७ व्यक्तींमधून एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात ओसरू लागली आहे, हे यावरून दिसून येते. तरीही नागरिकांनी कोरोना पूर्णत: गेला या भ्रमात राहू नये. मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा नियमित वापर या गोष्टी पाळत राहाव्यात, असे आवाहन आरोग्य विभाग, नगर परिषद आणि तहसील कार्यालयाकडून जनतेला करण्यात येत आहे.