बरांज तांडा येथे ॲन्टिजन तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:19+5:302021-05-11T04:29:19+5:30

भद्रावती : तालुक्यातील बरांज तांडा या ग्रामीण भागात ग्रामस्थांनी कोरोनापासून सावध राहावे, याकरिता तहसील प्रशासनातर्फे कोरोना ॲन्टिजन तपासणी ...

Antigen testing camp at Baranj Tanda | बरांज तांडा येथे ॲन्टिजन तपासणी शिबिर

बरांज तांडा येथे ॲन्टिजन तपासणी शिबिर

Next

भद्रावती : तालुक्यातील बरांज तांडा या ग्रामीण भागात ग्रामस्थांनी कोरोनापासून सावध राहावे, याकरिता तहसील प्रशासनातर्फे कोरोना ॲन्टिजन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आयोजक तहसीलदार महेश शितोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. असुटकर, ठाणेदार सुनीलसिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्मा, पोलीस उपनिरीक्षक गजानन तेलरांधे, बोढे, उपसरपंच प्रकाश भुक्या, पोलीसपाटील प्रज्ञा सोनटक्के यांच्यासह होमगार्ड, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते. येथील ग्रामस्थांना सर्वप्रथम कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर येथील एकूण ९२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात दोनजण पाॅझिटिव्ह आढळले. त्यांना उपचारासाठी जैन मंदिर येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले. प्रत्येक ग्रामस्थाने लसीकरण करून घेत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Antigen testing camp at Baranj Tanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.