प्रेमासाठी काय पण ! चंद्रपूरमधील वाघ, वाघिणीसाठी पोहचला तेलंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:38 PM2024-11-22T17:38:04+5:302024-11-22T17:38:56+5:30

Chandrapur : जॉनीचा ३०० किमीचा प्रवास केवळ रोमान्ससाठी

Anything for love! A tiger from Chandrapur reached Telangana for tigress | प्रेमासाठी काय पण ! चंद्रपूरमधील वाघ, वाघिणीसाठी पोहचला तेलंगणात

Anything for love! A tiger from Chandrapur reached Telangana for tigress

चंद्रपूरप्रेमात सात समुद्र पार करणारे प्रेमी युगुलांची प्रेम कथा तर तुम्ही वेळोवेळी ऐकतच असाल पण प्रेमाच्या शोधात प्राण्यांची धडपड क्वचितच ऐकायला मिळते. चंद्रपूर टिपेश्वर वाइल्डलाइफ अभयारण्यातील वाघ जॉनी. वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जॉनी  6 ते 8 वर्षांचा असावा. जॉनी टिपेश्वर जंगलातून 300 किमीचा प्रवास करत तेलंगणाला पोहोचला आहे आणि तेही पाटर्नरच्या शोधतात. सध्या जॉनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 


वन्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाघ आपल्या जोडीदाराच्या शोधात अनेक किलोमीटरचा प्रवास करतो आणि हे त्यांच्या नैसर्गिक वर्तनाचा भाग असतो. जॉनीचा प्रवास रेडिओ कॉलरद्वारे ट्रॅक करण्यात आला आहे. जॉनीने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून प्रवास सुरू केला. आदिलाबादच्या बोथा मंडळाच्या जंगल ओलांडून तो निर्मल जिल्ह्यातील कांतला, सारंगापूर, ममदा, पेंबी नंतर जॉनीने हैदराबाद-नागपूर NH-44 हायवे ओलांडला आणि आता तो तेलंगणातील तिर्याणी भागाकडे जात असल्याचे समजतंय.


आदिलाबादचे जिल्हा वन अधिकारी प्रशांत बाजीराव पाटील यांनी सांगितले की, जॉनीच्या या प्रवासामागचे कारण म्हणजे वाघाची मादी वाघिणी जोडीदार शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. वाघांना मादी वाघांच्या शोधात लांबचा प्रवास करावा लागतो, विशेषत: जेव्हा त्यांना त्यांच्याच प्रदेशात जोडीदार सापडत नाहीत.' वाघांना 100 किमी अंतरावरून मादी वाघांच्या स्नायूंचा वास ओळखता येतो. वन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, जॉनीचा मार्ग त्याला कावल व्याघ्र प्रकल्पात घेऊन जाऊ शकतो. 

Web Title: Anything for love! A tiger from Chandrapur reached Telangana for tigress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.