जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: June 27, 2017 12:47 AM2017-06-27T00:47:27+5:302017-06-27T00:47:27+5:30

सेनेटरी नॅपकीनला जीसटी करातून वगळण्याच्या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी देण्यात आले.

Appeal to district collector of District Congress | जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सेनेटरी नॅपकीनला जीसटी करातून वगळण्याच्या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी देण्यात आले.
भाजपा सरकारने देशात १ जुलैपासून वस्तू आणि सेवाकर लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जिवनावश्यक वस्तू करमुक्त करुन चैनीच्या वस्तूवर कर लावण्यात येणार आहे. शासनाने जीसटीप्रणालीमध्ये महिलांसाठी दैनंदीन गरजेचा सॅनीटर नॅपकीनला चैनीची वस्तू गृहीत धरुन त्यावर १२ टक्के कर लावला आहे. शासनाचा हा निर्णय महिलांच्या स्त्रीत्वाचा अपमान करणारा आहे. त्यामुळे या निर्णयातून सेनेटरी नॅपकीन बाद करण्यात यावी, तसेच कर्करोग रुग्णांना सॅनीटरी नॅपकीन व आरोग्य सेवा मोफत द्यावी, माध्यमिक शाळा व महाविद्यालयामध्ये सॅनीटरी वेंडीग व डिस्पोजबल मशिन लावावे, रेशनींग वरती सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्याची पूर्तत: करण्यात यावी, असे निवेदन महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, रजनी हजारे, नंदा अल्लूरवार उपस्थित होत्या.

Web Title: Appeal to district collector of District Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.