शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासंदर्भात निवेदन

By admin | Published: June 1, 2016 01:24 AM2016-06-01T01:24:11+5:302016-06-01T01:24:11+5:30

स्थानिक छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय सेवा समितीच्यावतीने येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्याची महानगरपालिकेने परवानगी प्रदान करावी,

Appeal on Shivaji Maharaj's horseback statues | शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासंदर्भात निवेदन

शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासंदर्भात निवेदन

Next

चंद्रपूर : स्थानिक छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय सेवा समितीच्यावतीने येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्याची महानगरपालिकेने परवानगी प्रदान करावी, यासाठी उपायुक्त विजय इंगोले यांना निवेदन देण्यात आले.
नगर परिषदेने १९७४ साली शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. असे निवेदनातून नमूद केले आहे. महानगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात सहकार्य केले जाईल, असे आश्वासन इंगोले यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात पुतळा कमिटीचे सदस्य नगरसेवक नंदू नागरकर, शेख मैकू शेख शहाबुद्दीन, पुतळा कमिटीचे अध्यक्ष ए. रामकुमार, सचिव प्रा. एस.टी. चिकटे, प्रा. माधव गुरनुले, पटले, गजानन भोसले, धिरज करपे, किशोर गणवीर, अंकुश राजूरकर, अनिल नागपूरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal on Shivaji Maharaj's horseback statues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.