खासगी डॉक्टर्स, नर्सेस, कामगारांनाही विमा लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:09 PM2020-03-28T23:09:43+5:302020-03-28T23:10:12+5:30
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. खासगी रूग्णालयांमधीलवैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कार्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, बंदोबस्तासाठी कार्यरत पोलस कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेच्या कामासाठी कार्यरत कंत्राटी कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. हा लढा देताना काही अनुचित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना काहीही मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विरोधातील लढ्यात सेवा देणारे खासगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कर्मचारी, स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, ग्रामीण व शहरी भागातील कंत्राटी स्वच्छता कामगार तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही ५० लाखांचा विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. खासगी रूग्णालयांमधीलवैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कार्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, बंदोबस्तासाठी कार्यरत पोलस कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेच्या कामासाठी कार्यरत कंत्राटी कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. हा लढा देताना काही अनुचित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना काहीही मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने शासकीय रूग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी व नर्सेससाठी जाहीर केलेला विमा शासनातर्फे त्यांच्या कुटुंबियांनाही लागू करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.