उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञाची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:48+5:302021-06-03T04:20:48+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात काही वर्षांपूर्वी डाॅ. रेवतकर यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हा महिलांचे सिझर व महिलांवरील किरकोळ शस्त्रक्रिया ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात काही वर्षांपूर्वी डाॅ. रेवतकर यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हा महिलांचे सिझर व महिलांवरील किरकोळ शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात येत होती. मात्र, मागील वर्षीपासून मूल येथे स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील महिला येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊनही त्यांच्यावर योग्य उपचार केला जात नाही. सिझर आणि कायदेशीर गर्भपात करण्यात चंद्रपूर किंवा इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी रेफर केले जात आहे. यामुळे गर्भवती महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञाची नियुक्ती करून महिलांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास दूर करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा वर्गाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक यांना तहसीलदार मूल यांच्या मार्फतीने पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, निहाल गेडाम उपस्थित होते.