शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ५७१ पदांच्या निर्मितीला मंजुरी

By admin | Published: January 11, 2017 12:37 AM2017-01-11T00:37:23+5:302017-01-11T00:37:23+5:30

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या...

Approval of 571 posts in Government Medical College and Hospital | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ५७१ पदांच्या निर्मितीला मंजुरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ५७१ पदांच्या निर्मितीला मंजुरी

Next

सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : आरोग्य विभागाचे परिपत्रक जारी
चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या ५०० खाटांच्या रूग्णालयाकरिता ५७१ पदांची चार टप्प्यात पदनिर्मीती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने ९ जानेवारी रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे वर्ग- १ ची २, वर्ग-२ ची ६ तर वर्ग-३ ची ५६३ अशी एकूण ५७१ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. वर्ग-१ च्या पदांमध्ये वैद्यकिय अधीक्षक, वैद्यकिय अभिलेख अधिकारी अशी एकूण २ तर वर्ग-२ च्या पदांमध्ये निवासी वैद्यकिय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, जीव रसायन शास्त्रज्ञ, मुख्य औषध निमार्ता, क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट यांची प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ पदांचा समावेश आहे.
वर्ग-३ च्या ५६३पदांमध्ये सहा अधिसेविका १, कार्यालयीन अधीक्षक ३, समाजसेवा अधीक्षक ४, भौतिकोपचार तज्ञ्ज १, परिसेविका ५०, सार्वजनिक आरोग्य परिचारीका ४, वरिष्ठ सहाय्यक ६, अधिपरिचारीका ३७५, स्पीच थेरपीस्ट १, आहारतज्ञ १, लघुलेखक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २४, क्ष-किरणतत्रज्ञ ४, निर्जतुकीकरण तंत्रज्ञ ३, प्लास्टर तंत्रज्ञ २, औषधनिर्माता १५, दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यक १, वरिष्ठ लिपीक २०, प्रयोगशाळा सहायक १२, क्ष-किरण सहायक ७, कनिष्ठ लिपीक १५, वस्त्रपाल २, वाहक चालक ८, नळ जोडारी २, जोडारी १, सुतार २ या पदांचा समावेश आहे.
वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील रूग्णसेवा प्रभावीपणे राबविण्याची प्रक्रिया या पदनिर्मीतीच्या माध्यमातून अधिक सुदृढ व सक्षम होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Approval of 571 posts in Government Medical College and Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.