३४७ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:52 PM2018-12-13T23:52:35+5:302018-12-13T23:53:39+5:30

जिल्ह्यातील शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखडयामध्ये करण्यात यावे. यासाठी २७ डिसेंबरला १२ तासांची मॅराथान बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण करावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Approval of draft of Rs 347 crores | ३४७ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

३४७ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य विषयांना प्राधान्य द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखडयामध्ये करण्यात यावे. यासाठी २७ डिसेंबरला १२ तासांची मॅराथान बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण करावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या २०१९-२० च्या ३४७.०९ कोटींच्या वार्षिक आराखडयास मंजुरी देण्यात आली.
२०१९-२० च्या योजनानिहाय विवरणपत्रानुसार अमलबजावणी अधिकाऱ्यांनी ६६९.८४ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यापैकी कमाल आर्थिक मर्यादेनुसार नियोजन विभागाने ३७४.०९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता. तर ३२२.७५ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत ३४७.०९ कोटी रुपयांच्या प्राथमिक प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
याशिवाय चंद्रपूर जिल्ह्याच्या २०१८-१९ मधील नोव्हेंबर अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा आढावादेखील या बैठकीत घेण्यात आला. २०१८-१९ साठी मंजूर नितयव्यय ५१०.७६ कोटीपैकी २५५.३० कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी १३४.३३ कोटी नोव्हेंबरअखेर खर्च झाला आहे. उर्वरित निधी तातडीने १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात यावा, अशी सूचना यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
यावेळी आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड.संजय धोटे व अन्य पदाधिकाºयांनी सूचना केलेल्या प्रमुख बाबी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी शेणगाव निसर्ग पर्यटन, वरोरा येथील ईको पार्क, पांढरकवडा-वडा रस्ता, महाकाली मंदिराचे सुशोभीकरण, आरोग्य केंद्र शेणगाव तसेच वरोरा नाका पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याची सूचना केली. सर्व अधिकाºयांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने योजनांची आखणी करावी, असे अवाहनही त्यांनी केले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
बैठकीला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना शामकुळे, आमदार विजय वडेट्टीवार, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आमदार रामदास आंबटकर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला नवनियुक्त सदस्य शंकर साबळे, राजीव गोलीवार, अरुण मडावी, डॉ.मंगेश गुलवाडे, जयप्रकाश कांबळे या सदस्यांचे स्मृतीचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.

वडेट्टीवारांनी मानव-वन्यजीव संघर्षाकडे लक्ष वेधले
आमदार विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीत मानव व वन्यजीव संघर्षाबाबत प्रश्न उपस्थित केला. जंगलाशेजारी गावांना आवश्यक तारांचे कुंपण करण्याबाबतची मागणी केली. याबाबतच्या योजनेमधील १० टक्के निधी ग्रामपंचायती भरु शकत नसल्याबद्दल माहिती दिली. संबंधित गावाचे प्रस्ताव देण्यात यावे व आमदार निधीतून यासाठी गरज पडल्यास निधी वितरित करावा, अशी सूचना सर्व आमदारांना पालकमंत्र्यांनी केली.

Web Title: Approval of draft of Rs 347 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.