येनोली माल येथील पांदन रस्त्याच्या मातीकामाला मंजुरी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:23+5:302021-03-21T04:26:23+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील अपूर्ण असलेल्या पांदन रस्त्याच्या मातीकामासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा सरपंच सेवा ...
सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील अपूर्ण असलेल्या पांदन रस्त्याच्या मातीकामासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे नागभीड तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच अमोल बावनकर यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल, रमाई घरकुल याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर अधिकाऱ्यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
येनोली माल येथील गावातील मुख्य रस्ता ते ऋषी बन्सोड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता २०२० ते २०२१ च्या आराखड्यात समाविष्ट केला आहे. हा रस्ता तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून, अर्धवट काम झालेले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदर पांदन रस्ता पूर्ण होणे गरजेचे आहे. याकरिता या पांदन रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात यावी, याबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सरपंच अमोल बावनकर यांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज लांजेवार, गंगासागर हेटीचे सरपंच दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती.