वाढोणाच्या ग्रामसभेत विविध विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:36+5:302021-09-02T04:59:36+5:30
तब्बल दोन वर्षे करावी लागली प्रतीक्षा; अनेक विकास कामांना मंजुरी सावरगाव : वाढोणा ग्रामपंचायतीची आमसभा सरपंच देवेंद्र गेडाम ...
तब्बल दोन वर्षे करावी लागली प्रतीक्षा; अनेक विकास कामांना मंजुरी
सावरगाव : वाढोणा ग्रामपंचायतीची आमसभा सरपंच देवेंद्र गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. वाढोणा या गावामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे ही ग्रामसभा घेण्यात आली.
ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समिती, वन हक्क समिती, रोजगार हमीसंदर्भात कामे, कृषी योजना, समाजकल्याणच्या योजना, नागरी सुविधेबाबत कामे, तसेच कोविड - १९ बाबत जनजागृती करणे अशा कामांना मंजुरी देण्यात आली. सर्व योजनांची माहिती ग्रामविकास अधिकारी कामेश वानखेडे यांनी दिली.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्यामसुंदर पुरकाम, ग्रा.पं. सदस्य वासुदेव मस्के, प्रदीप येसनसुरे, अनिल डोर्लीकर, रामेश्वर लंबेवार, ग्रा.पं. सदस्य मंगला बोरकर, रेश्मा सडमाके, सरिता शेंडे, प्रियंका गंजेवार, मीनाक्षी कोमावार, शशिकला ठाकरे, तंमुस अध्यक्ष दिनेश पगाडे यांची उपस्थिती होती.