आर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:21+5:30

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Arch, increase in irrigation due to pilot embankments | आर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ

आर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठा दिलासा: तालुक्यात बंधारे बांधण्याला प्राधान्य

भोजराज गोवर्धन।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : सिंचनाच्या अपुऱ्यां सोयीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जावू नये, यासाठी तालुक्यातील मारोडा येथील आर्च व चिरोली येथील पायलट बंधारा नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. या आर्च व पायलट बंधाऱ्यांमुळे परिसरातील सिंचनात वाढ झाली आहे.
तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील मारोडा येथील आर्च बंधारा केवळ आठ लाख रूपयांत पूर्ण करण्यात येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले आणि सहायक अभियंता रूपेश बोदले यांना यश आले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठाही मोठया प्रमाणावर आहे, पाणीसाठयात वाढ होण्याच्या दृष्टीने आर्च बंधारे नागपूर आणि अमरावती विभागात मोठया प्रमाणावर बांधण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर येथे पार पडलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंता बैठकीत दिले.
तालुक्यातील आर्च बंधाऱ्यासोबतच जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील पायलट बंधाराही नागरिकांचे आकर्षण बनले आहे. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १८३.३१ लक्ष निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सदर बंधाऱ्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
तालुक्यातील चिरोलीजवळील अंधारी नदीवर सुमारे ९० मीटर लांबीचा पूल २०१५-१६ या वित्तीय वर्षात बांधण्यात आले होते. सदर पूलाच्या बाजुला बांधलेल्या बंधाऱ्याला २.८३ मीटर लांब व ३.५० मीटर उंचीचे २३ दरवाजे लावण्यात आले आहे. या ठिकाणी ३.९३ लक्ष घनमीटर पाणी साठा राहू शकतो. केवळ सहा महिन्यात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच किमीपर्यंत पाण्याचा साठा आहे.
सदर बंधाऱ्याला वेगवेगळया राज्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी भेट देत आहेत. येत्या काही महिन्यात तालुक्यातील चिचाळा, बोरचांदली, नलेश्वर चिमढा येथील बंधाऱ्यांचे काम पुर्णत्वाा जाण्याची शक्यता आहे.

मुनगंटीवारांकडून अधिकाऱ्यांची स्तुती
सिंचनाची समस्या कायस्वरूपी दुर व्हावी, यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्करवार, उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले, सहा. अभियंता रूपेश बोदले यांचे सहकार्य लाभत आहे. तालुक्यातील मारोडा येथील १५ मीटर लांबीच्या आर्च बंधाऱ्याला माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची स्तुती केली. तालुक्यात यासारखे बंधारे मोठया प्रमाणावर बांधून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Arch, increase in irrigation due to pilot embankments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.