तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या गुरुजींना चाप

By admin | Published: January 10, 2016 12:59 AM2016-01-10T00:59:50+5:302016-01-10T00:59:50+5:30

शाळेची प्रार्थना आटोपल्यानंतर मुलं वर्गात जातात. गुरुजी वर्गात आल्याबरोबर ‘एक साथ नमस्ते’ गुडमार्निंग या शब्दांनी एका सुरात विद्यार्थी गुरुजींना अभिवादन करतात.

The archer, who consumed Tobacco substance | तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या गुरुजींना चाप

तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या गुरुजींना चाप

Next

नोकरी येऊ शकते धोक्यात : शासनाचे सर्व लाभ होणार बंद
तळोधी (बा) : शाळेची प्रार्थना आटोपल्यानंतर मुलं वर्गात जातात. गुरुजी वर्गात आल्याबरोबर ‘एक साथ नमस्ते’ गुडमार्निंग या शब्दांनी एका सुरात विद्यार्थी गुरुजींना अभिवादन करतात. मात्र गुरुजी वर्गात येण्यापूर्वीच तोंडात खर्ऱ्याचा बोचका भरून असल्यामुळे विद्यार्थ्यांना हातवारे खाली बसण्याचा इशारा करतात आणि तोंडातील खर्रा खाऊन तोंडात झालेला पचका खिडकीतून बाहेर किंवा वर्गखोलीच्या एका कोपऱ्यात उडवून हजेरी घ्यायला सुरूवात करतात. असे चित्र दररोजच शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये रोजच पहायला मिळत. पण यापुढे गुरुजींना आपली तलफ आवरावी लागेल नाही तर त्यांच्या नोकरीवर गदा येवू शकते.
शिक्षण संचालनालयाने ४ जानेवारी रोजी यासंदर्भात पत्र निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संपुर्ण शाळेतील शिक्षकांना तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट व दारूचे व्यसन करीत असलेल्यांना बंदी घालण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना खर्रा, तंबाखू व दारू तसेच पानाचे सेवन करून काही शिक्षक शिकवित असल्याचे निदर्शनास आले असुन त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे. त्यातून विद्यार्थीसुद्धा हळूहळू व्यसनाच्या अधिन होत आहे. ग्रामीण भागात अशा शिक्षकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे असेही त्यात नमुद केले आहे.
अशा प्रकारचे व्यसन करणाऱ्या शिक्षकांबद्दल कठोर निर्णय घेवून त्यांची बढती न करणे, पुरस्कार न देणे, त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचीत करणे व जे शिक्षक सांगुनही याचे पालन करीत नाही, त्यांना बडतर्फ करावे असे नमुद केले आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाला जि.प. शाळा व खासगी संस्थाच्या शाळांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे.
‘ओरीएंट ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरम’ या ठाण्याच्या स्वयंसेवी संस्थेने शिक्षण संचालकाकडे यासंबंधी तक्रार केली होती. शिक्षकच जर तंबाखू, गुटखा, खर्रा खाऊन अध्यापन करीत असेल तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन तेदेखील व्यसनाच्या अधिन जातात. (वार्ताहर)

व्यसनाला जवळ करणाऱ्या गुरूजींनो सावधान...
शिक्षण संचालनालयाकडून व्यसनी शिक्षकांविरूद्ध कारवाई करण्याच्या सुचना शिक्षण उपसंचालकांना प्राप्त झाल्या असुन त्यानुसार प्रामुख्याने ग्रामीण भागातील शिक्षकांवर लक्ष ठेवण्याचे सुचित करण्यात आले आहे.
या परिपत्रकामुळे व्यसनी गुरुजींच्या तंबूत विविध चचउधान आले आहे.
या परिपत्रकासंबंधीचा मेसेज मागील दोन दिवसापासून व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत आहे.
शाळेत असताना तंबाखू, खर्रा, पान न खाण्याचा संकल्प काही शिक्षकांनी केला तरी शाळेच्या बाहेर व्यसन करण्यावर ते ठाम आहे.

Web Title: The archer, who consumed Tobacco substance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.