कन्हाळगाव झरण क्षेत्रात रेती, लाकूड तस्करांना अटक

By admin | Published: January 23, 2017 12:35 AM2017-01-23T00:35:15+5:302017-01-23T00:35:15+5:30

मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हाळगाव वनक्षेत्रात एका आठवड्यात तीन मोठ्या कारवाई करुन जप्तीची व आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

In the area of ​​Kanhalgaon, the sand and wood smugglers were arrested | कन्हाळगाव झरण क्षेत्रात रेती, लाकूड तस्करांना अटक

कन्हाळगाव झरण क्षेत्रात रेती, लाकूड तस्करांना अटक

Next

तीन घटना : वनविकास महामंडळाची मोठी कारवाई
कोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हाळगाव वनक्षेत्रात एका आठवड्यात तीन मोठ्या कारवाई करुन जप्तीची व आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. सततच्या कारवाईमुळे शिकाऱ्यात, अवैध लाकूड तस्करांत व रेती तस्करांत दहशत निर्माण झाली आहे.
१७ जानेवारीला वनकर्मचाऱ्यांना सोबत घेवून विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ गस्त करीत असताना रात्री १२ च्या सुमारास लाठी-वेजगाव गावाच्या मध्यंतरी अवैधरित्या हायवा ट्रकमध्ये रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यात चार ब्रासची वाहतूक परवाना होता. मात्र प्रत्यक्ष दहा ब्रास रेती भरलेली होती. तपासणी अंती ट्रक जप्ती करुन तोहोगाव कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रक क्र. एमएच ३४ एडी ५१५१ जप्त करुन त्यांच्याकडून लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
२१ जानेवारीच्या रात्री चिवंडा-सोमनपल्ली जंगलात अवैद्य वृक्षतोडीसाठी सात बैलबंड्यासह गेल्याची माहिती वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांना मिळताच वनपाल संभाजी कोंडेवाड, विपूल आत्राम, वनरक्षक गव्हारे, तिरांगे, सिंगम, देवतळे, मलांडे यांचेसह आठ- दहा वनमजुरांना सोबत घेवून जंगलात प्रवेश केला. जंगलात रात्रभर जागून बैलबंड्यात सागवान फाटे ३०० नग व सहा बिट जप्त करण्यात आले. तस्करांना कारवाईची माहिती आधीच मिळाल्याने बंड्या जंगलातील झुडूपात लपवून पळून गेले.
२२ जानेवारीला कुडेसावली शेत शिवारात इलेक्ट्रीक करंटने रानडुकराची शिकार केल्याची वनरक्षक साबळे यांना माहिती मिळाली. वनविकास मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कुडेसावलीत दाखल होवून उमाजी मडावी, बाळू टेकाम, भोगलेश रंगारी, दशरथ गोंधळी व पंकज टेकाम यांना सापळा रचून रानटी डुकरासह जेरबंद केले. वन्यजीव कायद्यान्वये त्यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या एका आठवड्यात तीन कारवायांमुळे अवैध तस्करांचे व शिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. परिसरात अवैध वृक्षतोड व शिकार होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: In the area of ​​Kanhalgaon, the sand and wood smugglers were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.