ब्रह्मपुरी क्षेत्रातील ७३ हजार ७९५ एकर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:01:02+5:30

ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे.

The area under Brahmapuri area under cultivation is 8,969 acres | ब्रह्मपुरी क्षेत्रातील ७३ हजार ७९५ एकर शेती ओलिताखाली

ब्रह्मपुरी क्षेत्रातील ७३ हजार ७९५ एकर शेती ओलिताखाली

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न : ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे. हा ध्यास बाळगून काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मोठ्या शर्थीने तब्बल ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा विकास निधी मंजूर करून घेतला. साडेचार वर्षांत प्रकल्पांची कामे पूर्ण केल्याने या क्षेत्रात दरवर्षी सिंचनाची व्याप्ती वाढ आहेत.
ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे. गोसेखुर्दच्या कालव्यांच्या कामांना गती आली आहे. गोसेखुर्दचे पाणी उपसा सिंचनाद्वारे घोडाझरी तलावात सोडण्यासाठी त्यांनी शासनाला भाग पाडले. यासोबतच गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा धरणात आणण्यासाठी शासनाला बाध्य केले.
नलेश्वर धरणही शेतकऱ्यांना सिंचनासाठी सज्ज झाले आहे. या धरणातील पाणी शेतकºयांच्या बांधांपर्यंत जाण्यासाठी कालव्यांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. पुढचा शेतीचा हंगाम करण्यासाठी शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागून नये, यासाठी आमदार वडेट्टीवार यांनी सिंचन प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन कामे मार्गी लावली. याचा लाभ हजारो शेतकरी घेत आहेत.

गराडी नाल्यावर जलसेतू
गराडी नाल्यावर जलसेतू दुरुस्तीकरीता ६० लाखांचा निधी वापरण्यात आला. जलसेतूमध्ये ३०० मीटरच्या पूर्वी व नंतर हेडवॉलचे बांधकाम झाले. त्यात एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविले. यासाठी, गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या कोटगल प्रकल्पामधून २०० पाईप आणण्यात आले. युद्ध पातळीवर काम करून १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम केल्यामूळेच गोसीखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात येऊ शकले. गराडी नाल्यातील क्षतीग्रस्त जलसेतूच्या ३०० भागाचे अर्थवर्क व सिंमेट लाईनींगसाठी सुमारे १५ कोटी खर्च होणार आहे.

शेतीला बारमाही पाणी
आसोलामेंढा तलावातील पाणी वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात टाकण्यात येणार असून कापसी व साखरी नहरासह अन्य नहराद्वारे सावली तालूक्यातील ४० हजार हेक्टर शेतीला बारमाही सिंचनाची सोय झाली. शेतकरी परंपरागत एकच पीक न घेता वर्षातून दोन-तीनदा पीक घेऊन परिसरात हरितक्रांती घडविण्यासाठी सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत.

Web Title: The area under Brahmapuri area under cultivation is 8,969 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.