वाहतूक नियम तोडणे भोवले; ५५७ चालकांचे लायसन्स रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:01+5:302021-09-14T04:33:01+5:30

बॉक्स हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन दारू पिऊन वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर ...

Around breaking traffic rules; 557 driver's licenses canceled | वाहतूक नियम तोडणे भोवले; ५५७ चालकांचे लायसन्स रद्द

वाहतूक नियम तोडणे भोवले; ५५७ चालकांचे लायसन्स रद्द

Next

बॉक्स

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

दारू पिऊन वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर न करणे, हेल्मेट न वापरणे, एखाद्याच्या अपघातास कारणीभूत ठरणे आदी नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स निलंबन करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाठविला जातो. यानंतर त्यावर कारवाई करण्यात येते.

बॉक्स

आधी तीन महिने नंतर कायमस्वरूपी

सतत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच्या हातून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशांचे लायसन्स प्रथम तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. या काळात सुधारणा झाली नाही तर पुन्हा

कायमस्वरुपी निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर केला जातो.

बॉक्स

अशी होते कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे, यासंदर्भातील प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाला पाठविले जातात. शहर वाहतूक शाखा दर महिन्याला ही यादी तयार करून लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव पुढे सादर करीत असते. त्यानंतर पूर्वी तीन महिन्यांसाठी नंतर कायमस्वरुपी लायसन्स निलंबित केले जाते.

कोट

वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत असतात. मात्र, वारंवार कारवाई करूनही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीतच असतात. अशा वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक विभागाकडे पाठविण्यात येत असतो. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.

-प्रवीणकुमार पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक

------

२०१९ ४५७

२०२० ९३३

२०२१ ५५७

Web Title: Around breaking traffic rules; 557 driver's licenses canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.