आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

By admin | Published: July 6, 2016 01:04 AM2016-07-06T01:04:12+5:302016-07-06T01:04:12+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली मुंबई येथील बुद्धभूषण प्रिटिंग प्रेसची इमारत आंबेडकरी जनतेला प्रेरणास्त्रोत असून ती इमारत

Arrest Ambedkar Bhavan's commanders | आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

Next

निवेदन : आंबेडकरवादी संघटना कृती समितीची मागणी
बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली मुंबई येथील बुद्धभूषण प्रिटिंग प्रेसची इमारत आंबेडकरी जनतेला प्रेरणास्त्रोत असून ती इमारत पीपल्स इम्प्रव्हमेंट ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बुलडोजर चालवून पाडली. ती इमारत पाडणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांचेवर सख्त कारवाई करावी, अशी मागणी येथील आंबेडकरवादी संघटना कृती समितीने सरकारकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे नायब तहसीलदार वागघरे यांना समितीचे संयोजक भारत थुलकर यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले. या भवनाला परत नव्याने बांधण्यात यावे, अशीही मागणी याा निवेदनातून करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात रेखा मेश्राम, शालिनी वावरे, चंदा डुंबरे, वैशाली तिरपुडे, अरुण लोखंडे, संजय डुंबेरे, सत्यभामा भाले, ताईबाई फुलझेले, ईश्वर देशभ्रतार, कामिनी दुपारे, अनुसया मावलीकर, संगिता शेंडे, किरण देशभ्रतार, अनुकला वाघमारे, शीला बोरकर, दिलीप मून, मधुकर गजभिये, विरांगणा पेटकर, खरतड, डोंगरे, रेखा देशकर आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

भारिप बमसंचे निवेदन
राजुरा : मुंबई येथील डॉ. आंबेडकर भवन व बुद्ध भूषण प्रिटींग प्रेस उद्धवस्त करण्यात आले. त्या आरोपींवर कडक कारवाई करावी यासाठी भारिप बहुजन महासंघाचे वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अरुण देठे, मारोती मेश्राम, प्रकाश पायपरे, सखा थोरात, लवकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

आंबेडकर भवन पाडण्याचा निषेध
चंद्रपूर : मुंबई येथील डॉ. आंबेडकर भवन पाडण्यात आल्याच्या घटनेचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निषेध करण्यात आला.
विसापूर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला बौद्ध महासभा शाखा विसापूरचे अध्यक्ष अविनाश वाघमारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महेंद्र सोरते, अरुण बहादे, शामराव देठे, रामदास गाडगे, मदन बुरचुंडे, सुग्रीव वानखेडे, पुष्पा मुन व वंदना पुणेकर यांनी मार्गदर्शन केले. वास्तू पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन या सभेद्वारे ग्रामसचिव व सरपंच ग्रामपंचायत विसापूरमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

Web Title: Arrest Ambedkar Bhavan's commanders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.