पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

By admin | Published: June 28, 2014 02:29 AM2014-06-28T02:29:06+5:302014-06-28T02:29:06+5:30

बळीराजाला लागलेले ग्रहण निसर्गानेच गुरुवारी सोडविले. गुरुवारी जिल्ह्यातील काही तालुक्याने पावसाचे आगमन झाले आणि ...

By the arrival of the rain, the victim became dry | पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

Next

चंद्रपूर : बळीराजाला लागलेले ग्रहण निसर्गानेच गुरुवारी सोडविले. गुरुवारी जिल्ह्यातील काही तालुक्याने पावसाचे आगमन झाले आणि पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेला बळीराजा धरणीमातेची तृष्णा शांत होताच तृप्त झाला. आतापर्यंत खोळंवलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा वेग आला असून शेतातील लगबग जोमात सुरू झाली आहे.
मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. मृग लोटून पंधरवाडा उलटला. तरीही पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली होती.
यंदा जिल्ह्यातील चार लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. यात एक लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यासोबतच एक लाख ७९ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात येणार असल्याचाही कृषी विभागाचा अंदाज आहे. एवढे मोठे खरिपाची लागवड होणे पावसाअभावी शिल्लक होते. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत होता. जूनचा अखेरचा आठवडाही सुरू झाला. तरीही पावसाची चिन्ह नव्हती. उलट उन्हाची काहिली जाणवत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना २०१२ चा दुष्काळ आठवू लागला होता. अशातच काल बुधवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर तब्बल तासभर पाऊस पडत राहिला. या पावसामुळे जमिनीत पाणी साचले नसले तरी जमीन बऱ्यापैकी ओली झाली आहे. त्यामुळे पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन ओली होताच शेतीकडे धाव घेणे सुरू केले आहे. बी-बियाणे घेऊन आतापर्यंत हातावर हात ठेवून असलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: By the arrival of the rain, the victim became dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.