स्वराज्य ध्वजाचे भद्रावती जैन श्वेतांबर मंदिरात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:29+5:302021-09-18T04:30:29+5:30

भद्रावती : भारतातील सर्वांत उंच भगवा ध्वज असा दावा करण्यात येत असलेल्या ‘स्वराज्य ध्वजा’चे भद्रावती जैन मंदिर येथे आगमन ...

Arrival of Swarajya flag at Bhadravati Jain Shwetambar Temple | स्वराज्य ध्वजाचे भद्रावती जैन श्वेतांबर मंदिरात आगमन

स्वराज्य ध्वजाचे भद्रावती जैन श्वेतांबर मंदिरात आगमन

googlenewsNext

भद्रावती : भारतातील सर्वांत उंच भगवा ध्वज असा दावा करण्यात येत असलेल्या ‘स्वराज्य ध्वजा’चे भद्रावती जैन मंदिर येथे आगमन झाले असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा १८ टन वजनाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण अर्थातच भुईकोट किल्ल्याच्या आवारात ध्वजस्तंभ तयार झालेला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील गोदड महाराज मंदिरातून गुरुवारी आमदार रोहित पवार यांच्या ध्वजपूजनानंतर स्वराज्य ध्वज यात्रेला सुरुवात झाली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्य ध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील सहा राज्ये, ७४ प्रेरणास्थळे अशी ही यात्रा असेल.

सोमवारी या ध्वजयात्रेचे स्वागत भद्रावती शहरात करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी पूजा व आरती केली. याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर, महिला शहराध्यक्ष सबिया देवगडे, कामगार सेल जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, युवक शहराध्यक्ष रोहन कुटेमाटे, क्रिष्णा तुराणकर, रोशन कोमरेड्डीवार, सूरज बेले, अमोल बडगे, राकेश किनेकर, विद्यार्थी अध्यक्ष आशिष लिपटे, शहर महासचिव संतोष वासमवार, नीलेश जगताप, सौरव घोटेकर, मिलिंद रामटेके, ओंकार पांडे, बिपीन देवगडे, गणेश गणवीर, शुभम किटे, गौरव आमटे उपस्थित होते.

Web Title: Arrival of Swarajya flag at Bhadravati Jain Shwetambar Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.