व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलेची देवाणघेवाण आवश्यक
By admin | Published: January 19, 2017 12:55 AM2017-01-19T00:55:30+5:302017-01-19T00:55:30+5:30
माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो.
चंदनसिंह चंदेल यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात समारंभ
बल्लारपूर : माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो. सुरुवातीला तो घरातून नंतर शाळेतून तद्नंतर समाजातून शिक्षण घेत असतो. यातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असतो. या कलागुणांची देवाण-घेवाण व्यक्तीमत्त्व विकासासाठी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
महाराजा लॉन येथे किरणाश्रय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘चला वाटू या वाण कलागुणांचे’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले, नगरसेविका रेणूका दुधे, ज्योती भूते, अश्विन मुसळे, रणजित डवरे, प्रशांत विघ्नेश्वर, मधु कपूर, मंगेश देशमुख, जयश्री मोहूर्ले, आशा संगीडवार, पूनम निरंजने, सुवर्णा भटारकर, सारिका कनकम, सोनम सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसेविका मधू कपूर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविकात किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले यांनी संस्थेचे उद्देश विषद केला. त्यानंतर अन्य पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, गायन, योगा, नाटिका आदी स्पर्धा पार पडल्या. यावेळी लोणचे, आवळ्याचे पदार्थ, विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण शेख यांनी दिले. संचालन मिना झाडे यांनी तर आभार शुभांगी भेंडे यांनी आभार मानले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)