कला, साहित्य, संस्कृतीमुळे मानवी जीवनाला मिळते दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:04 PM2019-01-18T22:04:29+5:302019-01-18T22:04:49+5:30
सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे. कला, संस्कृतीमुळेच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते रजा मुराद यांनी केले. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे. कला, संस्कृतीमुळेच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते रजा मुराद यांनी केले. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आयोजक तथा आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी 'स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या नायिका स्नेहलता वसईकर, मालविता गायकवाड, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिता उराडे, अॅड. राम मेश्राम, किरण वडेट्टीवार, शिवाणी वडेट्टीवार, फादर मॅथ्थू, जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, गटनेता विलास विखार, नगरसेवक अशोक रामटेके, प्राचार्य, डॉ. भाऊसाहेब जननाडे, तालुका काँगे्रस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, अॅड. गोंविदराव भेंडारकर, थानेश्वर कायरकर, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, बालू राऊत, महेश भर्रे, बाला शुक्ला, डॉ. सतीश कावळे, मंगला लोनबले आदी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली. रजा मुराद म्हणाले, पहिल्यांदा शहरात आलो. विविध क्षेत्रातील विधायक कार्यात आमदार वडेट्टीवार यांची धडपड बघायला मिळते. त्यांच्याकडे मी भावी मंत्री म्हणून पाहतो आहे. संचालन, प्रास्ताविक डॉ. मोहन वाडेकर यांनी केले. प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी आभार मानले. कार्यक्रमात परिसरातील हजारो रसिक उपस्थित होते.
कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद
महोत्सवात ७५ स्टॉल्स लावण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार विजय वड़ेट्टीवार यांनी केले. राजू संतोषवार, डॉ. राजु फुलझेले या प्रदर्शनासाठी परिश्रम घेत आहेत. नागरिकांसाठी आधार कॉर्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हजारो नागरिक आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत. आरोग्य शिबिरासाठी डॉ. लाडुकर, डॉ. रवीशंकर आखरे, डॉ. संजय जयस्वाल, डॉ. सतीश कावळे, डॉ. नितिन उराडे आदींनी नियोजन केले.